वेताळबांबर्डे येथे ७ रोजी श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. वेताळबांबर्डे गावात वासुदेव (बाळा) गावडे यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. स्वामी समर्थ यांच्या अन्नछत्र मंडळ येथून निघालेली पालखी व पादुकांचे ७ रोजी वेताळबांबर्डे गावात स्वागत होईल.

सकाळी ९.१५ वा. महाराजांची पालखी व पादुकांची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर वेताळबांबर्डे पावणाईटेंब-दारवळवाडी येथील वासुदेव (बाळा) गावडे यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन होईल.

दिवसभराचे नियोजित कार्यक्रम:

सकाळी ९.३० वा. : पालखी व पादुका दर्शनास प्रारंभ.

सकाळी ११.०० वा. : श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती.

सकाळी ११.३० वा. : महाप्रसाद वितरण.

दुपारी १.०० वा. : महाराजांच्या नामाचा जप.

सायंकाळी ४.०० वा. : पालखी व पादुका पुढील परिक्रमेसाठी मार्गस्थ होतील.

पालखी व पादुका सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत श्री. गावडे यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी उपलब्ध असतील. सर्व भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळा गावडे व परिवारातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!