सत्ताधाऱ्यांचा विरोधातील उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील‌ आणि सत्ता परिवर्तन घडेल – विनायक राऊत

फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात जनता सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करतील

अनंत पिळणकर यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील

कणकवली : फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत.मतदारांना घरोघरी भेट देत असताना फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर,फोंडा पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत, लोरे पंचायत समितीचे उमेदवार किर्ती एकावडे यांना फोंडा मतदार संघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनंत पिळणकर यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवारांचा विजय निश्चित आहे.असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

माजी खासदार विनायक राऊत यांनी फोंडा येथे निवडणूक प्रचारादरम्यान आले असता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची त्यांनी भेट घेतली.यावेळी ते बोलत होते.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, फोंडा जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर, फोंडा पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत आणि लोरे पंचायत समितीचे उमेदवार किर्ती एकावडे,देवा पिळणकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार विनायक राऊत म्हणाले की,फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्षे प्रतिनिधीत्व करताना विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करताना विकासाच्या नावाखाली भकासगीरी केली आहे.त्यामुळे येथील जनता सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करुन‌ परीवर्तन करेल.आणि आपला उद्रेक मतपेटीतून व्यक्त करतील.असा विश्वास व्यक्त केला.

माजी खासदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की,अनंत पिळणकर यांची निशाणी तुतारी आहे. फोंडा पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत आणि लोरे पंचायत समितीचे उमेदवार किर्ती एकावडे यांच्या निशाणी मशाल असून त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदार त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील.अशी‌ खात्री आपण व्यक्त करतो.असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!