वेंगुर्ले तालुक्यात सरपटणाऱ्या प्राण्याच्या चाव्याने महिलेचा मृत्यू….

वेंगुर्ले : तालुक्यातील होडावडा-कस्तुरबावाडी येथे २० मे ला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये सरपटणाऱ्या अज्ञात प्राण्याच्या चाव्याने प्रियतमा गोपाळ दाभोलकर (६३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियतमा दाभोलकर या आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये गेल्या असताना त्यांच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला कोणत्यातरी सरपटणाऱ्या जनावराने चावा घेतला. त्यांच्या आरडाओरडीने घरातील मंडळी धावली असता त्यांना सरपटणाऱ्या प्राण्याने चावा घेतल्याचे समजले. त्यांना तात्काळ औषधोपचारांसाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री ८ वाजता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी होडावडा-देऊळवाडी येथील अरविंद गोपाळ नाईक यांनी वेंगुर्ले पोलिसांत खबर दिली. त्यानुसार अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चौहान करत आहेत.

error: Content is protected !!