हुमरमळा वालावल गावातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासुन वाचवा – – श्री अतुल बंगे


शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व सौ कंपाऊंड साठी वनखात्याकडुन अनुदान – वनपाल दीनेश टीपुगडे


हुमरमळा वालावल गावातील गव्या रेड्यांचा कळप शेती नुकसान करीत आहेत व स्मार्ट मिटर मुळे जी लाईट बिले आली ती ग्राहक भरुच शकत नाही यासाठी आज सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु या सभेला विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली आणि वनविभागाचे वनपाल दीनेश टीपुगडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समर्पक उत्तरे देत जी काही वनविभागाकडुन शेती नुकसानी किंवा कायमस्वरूपी विलाज म्हणून अनुदानावर सौर ऊर्जा कंपाऊंड योजना कार्यान्वित करण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे असे सांगितले
सभेपूर्वी श्री बंगे यांनी शेतकरी आणि विज ग्राहक यांची सभा कशासाठी याचे विश्लेषण करत दरवर्षी शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासुन आपली शेती गमवावी लागते अगदी गवे रेडे दीवसा ढवळ्या शेतात गुरे चरतात असे राजरोस पणे नुकसान करीत आहेत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे असे सांगुन श्री बंगे यांनी कायमस्वरूपी वन्यप्राणी बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली
विज मंडळाचे अधिकारी फिरकलेच नाहीत
सभा सुरू अकरा वाजता सुरू झाली तरी विज मंडळ अधिकारी आंदुर्ले पाट या ठीकाणी असताना सभे ठीकाणी येण्याचे धाडस करीत नव्हते
यावेळी श्री बंगे म्हणाले स्मार्ट मिटर अगदी चोरांसाखे बसवुन जात असुन आठशे रुपये येणारे विज बिल आता साडेसात हजार आले आहे त्यामुळे विज ग्राहक ही विज बिले भरुच शकत नाहीत म्हणुन विज ग्राहक आज माड्याची वाडी, पाट, हुमरमळा, चेंदवण पडोसवाडी येथुन उपस्थित होते
यावेळी श्री बंगे यांनी सांगितले पंचक्रोशीतील नागरीकांनी जागरुक राहुन स्मार्ट मिटर बसवुन घेऊ नका जर का अदानी कंपनीची माणसे मिटर बसवण्यासाठी आलेच तर होणा-या परीणामांना तोंड विज मंडळ अधिकारी यांनी द्यावे असे आवाहन केले
यावेळी सरपंच श्री अमृत देसाई यांनीही सभेला संबोधित केले यावेळी ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील, वनपाल श्री दीनेश टीपुगडे, माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर, विकास तावडे, रमाकांत वालावलकर, विजु पेडणेकर, किशोर वालावलकर, विष्णु वालावलकर, सुमन वालावलकर, भरत परब, तात्या कद्रेकर, दीपक चव्हाण, गुंडु परब, तृप्ती राणे, मंदार वरक, संजय पेडणेकर, महेश कानडे, भरत शृंगारे, प्रणव घारे, संदीप तर्फे, गिरीश देसाई, पपु दळवी, आपा राणे, दर्शना मार्गि,न्यानदेव परब, यशवंत परब, नारायण राणे आदी शंभर ग्रामस्थ महीला उपस्थित होते

error: Content is protected !!