कुडाळ : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेचा गुरुपौर्णिमेच्याच्या शुभमुहूर्तावर झाराप मधील प्रथितयश उद्योजक श्री दिलीप प्रभुतेंडोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी,संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर संस्था उपाध्यक्ष श्री भास्कर परब ,संस्था उपसचिव श्री रमाकांत धुरी,संचालक श्री सतीश साळगांवकर ,श्री बबन बोभाटे, श्री तुकाराम गोडे,मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार , महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सचिन पाटकर,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री उमेश प्रभुतेंडोलकर ,झाराप सरपंच सौ.दक्षता मेस्त्री,शिक्षक पालक संघाचे श्री वासुदेव मेस्त्री, श्री लक्ष्मण पालव, श्री संजय सामंत श्री श्याम सामंत, सौ.स्मिता पारळे,श्रीम.वैशाली खानोलकर,श्री आळवे, श्री एकनाथ गवस,श्री नितीन कुडाळकर,ऍड परवेज मुजावर तसेच अनेक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थी वाहतुक व्यवस्थेचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला तर गाडीचं औक्षण उद्योजिका माजी विद्यार्थिनी सौ.स्मिता पारळे व झाराप सरपंच सौ.दक्षता मेस्त्री यांनी केलं.यावेळी विद्यालयाच्या माजी विदयार्थीनी सौ. शोभा शरद सामंत पूर्वाश्रमीच्या श्रीम. पुष्पलता अच्युत प्रभुतेंडोलकर पुरस्कृत गरीब होतकरू विद्यार्थ्यांनासाठीच्या बक्षिस योजनेची दहावीमध्ये प्रथम आलेल्या कु.नेहा सावळाराम माणगांवकर हिला रोख रु.सात हजार एक व विद्यार्थ्यांना मध्ये प्रथम आलेल्या साहिल गुरुनाथ टिळवे याला रु.पाच हजार एक व बारावी मध्ये प्रथम आलेल्या कु.सानिका सुदाम डिचोलकर हिला रोख रु.सात हजार एक तर बारावी आलेल्या कु.साहिल आत्माराम कोलार याला रोख पाच हजार एक वितरीत करण्यात आले.यावेळी विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेसाठी रुपये पाच हजारच्या वर देणगी दिलेल्या दात्यांचा सत्कार शाल , श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्थे करण्यात आला . या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना संस्थेचे जेष्ठ संचालक श्री सतीश साळगावकर यांनी माजी विद्यार्थी व सर्व दात्याचे आभार मानत आपण आपल्या शाळेच्या विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेसाठी अल्पावधीत जो उस्फुर्त प्रतिसाद दिला हे खरोखरच कौतुकास्पद आहे असेच प्रेम व विश्वास भविष्यातही राहू दे असा यानिमित्ताने आशावाद व्यक्त केला. यावेळी संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर यांनी विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेची गरज व महत्व आजी-माजी विद्यार्थ्यांन समोर विशद करत माजी विद्यार्थी व शिक्षणाप्रति प्रेम असणाऱ्या सर्व दात्यांनी केलेले सहकार्य लाख मोलाचे असून विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने या व्यवस्थेचा लाभ घ्या व आपली शैक्षणिक प्रगती साध्य करा, भविष्यात या शाळेला कधीही विसरू नका असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी तर सुत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री विद्यानंद पिळणकर व सहाय्यक शिक्षक श्री एकनाथ कांबळे यांनी केलं.तर उपस्थितांचे आभार संस्था सचिव श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था पदाधिकारी शिक्षक पालक संघ सदस्य सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.