अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अ. भा. म. महासंघ ॲड. सुहास सावंत यांचे आयोजन
कुडाळ : रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघ, कुडाळ आणि अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक भातशेती लागवड उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या लागवडीतून निर्माण होणाऱ्या भात पिकाचा वापर पुढील वर्षी शेतकऱ्यांना ते बियाणे शेतकऱ्यांकडून तयार झालेल्या भाताची विक्री व्यवस्था मराठा महासंघ व त्याची सहयोगी उपक्रम मराठा उद्योजक दिरेक्टरी मार्फत केली जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्याचा महासंघाचा प्रयत्न आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.