वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि. ११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन’ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.एम.आय. कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे, सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर. एम.गुलदे, प्रा.एस.आर.राजे उपस्थित होते.
भारतातील लोकसंख्या वाढीचे सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम यावर डॉ.एम.आय.कुंभार यांनी मार्गदशन केले. लोकसंख्या नियंत्रणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे श्री.संजय रावराणे यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसतो आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात डॉ.एन.व्ही.गवळी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.ए. पैठणे, प्रा.एस.एम.करपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.आर. एम. गुलदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एस. आर. राजे यांनी केले. प्रा. आर. बी. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र विभाग आणि वाणिज्य विभागाने केले होते.