यामुळे दोन्ही जात प्रवर्गातील नागरिकांना जातीचा दाखला घेण्यासाठीची त्रासदायक प्रक्रिया होणार आता सोपी
याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी प्रांत यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या तीनही तालुक्यामध्ये जातीचे दाखले काढण्यासाठी यापूर्वी काही जाचक कागदपत्रे सर्व सेतू/ आपले सरकार केंद्रांकडून आणि तहसीलदार मधील प्रकरण तापासणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात येत होती.ज्यामध्ये सर्वात जाचक कागदपत्रे म्हणजे 1967 पुर्वीचा घरपत्रक उतारा आणि दुसरे म्हणजे प्रतिज्ञापत्र. आणि ही कागदपत्रे मिळाली नाहीत तर त्यासाठी पर्याय म्हणून महसूल विभागाकडून राबवण्यात येणारी प्रक्रिया ही अतिशय त्रासदायक होती.तसेच हे कागदपत्रे नसतील तर सेतू/आपले सरकार केंद्रे अर्जदाराचे अर्जच दाखल करून घेत नव्हते.ज्यामुळे नागरिकांना जातीचे दाखले घेणे अशक्य होत होते.त्यामुळे SEBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थी तसेच नागरिकांना शैक्षणिक आणि नोकरीसाठी जातीचा दाखला घेणे अडचणीचे होते.परिणामी बरेच नागरिक जातीय आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत होते.
परंतु मराठा आणि OBC शिष्टमंडळाने ही बाब सावंतवाडी प्रांत यांच्याकडे योग्य रित्या मांडल्यानंतर घरपत्रक उतारा हे कागदपत्र जातीच्या दाखल्यासाठीबंधनकारक नसल्याचे सांगितले.त्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करताना कोणत्याही कारणासाठी 1967 पुर्वीचा घरपत्रक उतारा देण्याची आवश्यकता यापुढे अर्जदारांना भासणार नाही.
तसेच प्रतिज्ञापत्र(अफेडेवीट) घेण्याची पद्धत ही आपल्या राज्यात 2015 मधेच बंद झाली असून शासन निर्णय- प्रसुधा १६१४/३४५/प्र. क्र.७१/१८-अ दिनांक ०९ मार्च २०१५ अन्वये शासकिय सोयी सुविधांचा स्वघोषणा पत्र आणि कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रति स्वीकारणे बंधनकारक आहे.त्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी प्रतिज्ञापत्र(अफेडेवीट) देण्याची आवश्यकता नाही त्याऐवजी स्वघोषणापत्र देता येईल.या कागदपत्रां संबंधीच्या सूचना सर्व तहसीलदार आणि सेतू/ आपले सरकार केंद्र यांना देण्यात येतील असे आश्वासन सावंतवाडी प्रांत श्री हेमंत निकम यांनी दिले.या बदलामुळे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यातील असंख्य नागरिकांना लाभ होणार आहे तसेच जातीचा दाखला घेणे आणि जातीय आरक्षणाचा लाभ घेणे सोपे होणार आहे.
या शिष्टमंडळामध्ये मराठा समाजाकडून अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे जिल्हा सचिव श्री.वैभव जाधव,अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी चे तालुकाध्यक्ष श्री.अभिषेक सावंत तसेच OBC समाजाकडून ऍड.समीर वंजारी यांनी समाजाची बाजू मांडली.तसेच जे सेतू/आपले सरकार केंद्र किंवा अधिकारी अशा चुकीच्या कागदपत्रांची मागणी करत असतील त्यांची तक्रार थेट प्रत अधिकारी श्री.निकम यांच्याकडे करावी असे आवाहन शिष्टमंडळाने केले आहे.तसेच पहिल्यांदा च जनतेचे कागदपत्रांच्या बाबतीत अडचणी सोडवण्यासाठी काही नवीन आपले सरकार केंद्र चालक यांनी पुढाकार घेतला ही बाब वाखाडण्याजोगी आहे. यापुढे काही अडचण असल्यास वैभव जाधव- 9112091326,अभिषेक सावंत- 9421149818,समीर वंजारी- 9822454023 यांच्याशी संपर्क करावा. असे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.