कुडाळ मांडकुली येथे विवाहितेची गळफास लाऊन आत्महत्या

मानसिक स्थिती बिघडल्याने घेतला गळफास

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली येथे ४८ वर्षीय विवाहितेने मानसिक स्थिती बिघडल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रदन्या प्रमोद पेडणेकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मागील तीन वर्षांपासून मनोरुग्ण होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदन्या यांचे पती प्रमोद श्रीधर पेडणेकर हे कामासाठी एमआयडीसी, कुडाळ येथे गेले होते. दुपारी सव्वा एकच्या सुमारास प्रमोद पेडणेकर घरी परतले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा आतून बंद आढळला. तसेच, पाठीमागील दरवाजाही बंद होता. त्यामुळे त्यांनी समोरील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी प्रदन्या पेडणेकर यांनी घरातील माळीवर छताच्या वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

या घटनेमुळे पेडणेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रदन्या यांच्या पश्चात त्यांचे पती प्रमोद, मुलगा प्रणव आणि मुलगी प्रिया असे कुटुंब आहे. कुडाळ पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!