पांग्रड हायस्कूलची माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम

ब्युरो न्यूज: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पांग्रड हायस्कुलने आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम ठेवत दैदिप्यमा यश प्राप्त केले आहे.प्रथम क्रमांक कुमारी. दिप्ती दिपक सातोसे,द्वितीय क्रमांक कुमार. शुभम राजाराम नाईक आणि तृतीय क्रमांक कुमारी. मोसमी रामचंद्र मर्गज. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या शाळेचा दरवर्षीचा निकाल १००% लागत असून यावेळी तब्बल १० विद्यार्थी हे ८०% च्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.तसेच इतर सर्व विद्यार्थी ६५ % च्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

यशाचा वारसा जपणारी शाळा

मुख्याध्यापक , शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्ग.यांचा विद्यार्थ्यांच्या या यशात तितकाच महत्वाचा आणि मोठा वाटा आहे. डिसेंबर पासूनच प्रत्येक विषयाच्या सराव परीक्षा तसेच प्रत्येक विषयांचे वाढीव तास घेऊन मुलांच्या प्रत्येक शंकांचे निरसन केले जाते.मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महिना अखेर सांस्कृतिक तसेच बौद्धिक कार्यक्रम घेतले जातात.त्यामुळेच पांग्रड हायस्कूलच्या ह्या यशोगथेचा वारसा अजूनही कायम आहे.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मुख्याध्यापक ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पांग्रड आणि निरुखे ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पांग्रड हायस्कूल अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेलं हायस्कूल आहे.

error: Content is protected !!