आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचा यावर्षीचा निकाल 100%

कुडाळ : तालुक्यातील मागासवर्गीय एज्युकेशन संचलित प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचा यावर्षीचा निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक कु. अक्षरा मिलिंद नाईक 90. 40% , द्वितीय क्रमांक कु. भालचंद्र प्रकाश परब 86.60% तर कु. समृद्धी अरुण ठाकूर 86.40% हिने तृतीय क्रमांक पटकविला आहे.

यावर्षी प्रशालेतून एकूण 16 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत,श्री सरवटे जी व्ही, श्री अनिल गोवेकर ,सौ प्रज्ञा रांगणेकर मॅडम व श्री राहुल कानडे सर या सर्व शिक्षकांचे संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर, संस्था सचिव श्री. अंकुश जाधव, खजिनदार श्री. देवदत चुबे, संस्था उपाध्यक्ष श्री. अर्जून परब, कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे व सर्व संचालक, सभासद ,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक,व सर्व शिक्षणप्रेमी यांजकडून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!