वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते.
MH07AU1900 या स्विफ्ट गाडीची धडक तेथील स्ट्रीट लाईटच्या खांबाला बसून खांब तुटून पडला त्यामुळे स्ट्रीट लाईट देखील खंडित झाली आहे
मात्र मध्यरात्री झालेल्या अपघाताबद्दल स्थानिकांना कोणतीही कल्पना रात्री मिळाली नाही सकाळी सदर गाडी अपघात ग्रस्त दिसल्यानंतर स्थानिक पोलीस पाटील यांच्या सह ग्रामस्थांनी गाडीजवळ जाऊन पाहिले असता गाडीमध्ये कोणीही नसल्याचे सांगण्यात आले.
सदर अपघाताची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांनी कुडाळ पोलीस स्टेशनला दिलेली आहे.