२० वर्षीय तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन राहत्या घरी संपवले जीवन

वैभववाडी : तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दिवेश दीपक कांबळे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दिवेश हा वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. जेवण करण्यासाठी त्याला कुटुंबीय शोधत असताना, त्याची खोली आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खिडकीतून पाहिले असता, दिवेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी तातडीने दरवाजा तोडून त्याला खाली उतरवले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती त्याचे वडील दीपक धोंडू कांबळे यांनी वैभववाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. मात्र, दिवेशच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि आजोबा असा परिवार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. पाटील करत आहेत. एका होतकरू तरुणाच्या अचानक जाण्याने शिक्षण क्षेत्रात आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!