सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग महासंघाच्या कार्यकारीणी ची मासिक सभा गुरुवार दिनांक १७.०४.२०२५.रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता सावंतवाडी येथील खासकीलवाडा भंडारी भवन सावंतवाडी या तालुका भंडारी समाज मंडळाच्या वास्तू मधील कै.सहदेव उर्फ काका मांजरेकर सभागृह येथे जिल्हा भंडारी महासंघाची सभा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.तुकाराम उर्फ हेमंत करंगुटकार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महासंघाचे सर्व पदाधिकारी,कार्यकारीणी चे सदस्य,तसेच पदसिद्ध सदस्य व स्विकृत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली.या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांच्या परवानगी नुसार आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री. श्री.तुकाराम उर्फ (हेमंत) करंगुटकार,भंडारी युवा जिल्हाध्यक्ष श्री.समिल प्रभाकर जळवी,माजी जिल्हाध्यक्ष श्री.रमण शंकर वायंगणकर,श्री.विकास वैद्य,सावंतवाडी भंडारी तालुकाध्यक्ष श्री.दत्तप्रसाद गोपाळ अरविंदेकर,भंडारी जिल्हा सदस्य,श्री.प्रियदर्शन अर्जुन कुडव,श्री.दिवाकर राजाराम मावळणकर, श्री.नामदेव साटेलकर,श्री.सिद्धार्ध गुरुनाथ पराडकर,श्री.चंदन दयाळ पांगे,श्री.दीपक मनोहर कोचरेकर भंडारी समाज बांधव उपस्थित होते.













