शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट.

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी.

सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणात आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला वेगळं वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही चौकशीची मागणी करत संबंधीतांनी दोन वर्षे विडिओ लपवून घेवत आता नेमक्या कुठक्या उद्देशाने प्रसारित केले याचाही तपास करण्याची मागणी केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, संतोष साटविलकर, दादा साईल, विनायक राणे, अरविंद करलकर, ओंकार तेली, रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!