मुंबई: गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या 50 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. कोकणातूनच 40 हजार पेट्या आंबागुढीपाडवा मुहूर्त साधत कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी मार्केटमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी पाठवत असतात. रविवारी देखील मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांचा 40 हजार 364 पेट्या दाखल झाल्या. तसेच इतर राज्यातील 10 हजार 518 पेट्या दाखल झाल्या आहेत. दरवर्षी या प्रमाणात पेट्या मार्केटमध्ये दाखल होत असतात. विशेष म्हणजे कोकणचा हापूस निर्यात होण्यास सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असते.