खाडीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कालवे काढताना घडली दुर्घटना

देवगड : कालवे काढताना खाडीच्या पाण्यात बुडालेल्या प्रदीप चंद्रकांत बाईत (३३, रा. नाडण वीरवाडी) या तरुणाचा मृतदेह बाडातर हनुमान मंदिरानजीकच्या मागील बाजूस सोमवारी सकाळी ६.१५ वा. च्या सुमारास खाडी किनारी आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप बाईत हा १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसमवेत वीरवाडी खाडी येथे कालवे काढण्यासाठी गेला होता. त्याने पाण्यात डुबकी मारल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. सहकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, शोध न लागल्याने तो बेपत्ता असल्याची फिर्याद त्याचा भाऊ कैलास चंद्रकांत बाईत (२१, नाडण वीरवाडी) याने देवगड पोलीस स्थानकात दिली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी ६.१५ वा. च्या सुमारास प – दीप बाईत याचा मृतदेह बाडातर हनुमान मंदिरानजीकच्या मागील बाजूस खाडीकिनारी आढळून आला. या घटनेची फिर्याद कैलास बाईत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत. प्रदीप बाईत याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!