स्टँडअप कॉमेडियन रणवीर अल्लाहबादिया नंतर आता स्वाती सचदेवाने केले पालकांबाबत वादग्रस्त विनोद

ब्युरो न्यूज: आजकाल विनोद म्हटल की डोळ्यासमोर पांचट आणि अतिशय घाणेरड्या भाषेत केलेली एखादी टिप्पणी असाच अर्थ झाला आहे. कॉमेडी शोच्या नावाखाली बरेच अश्लील विनोद करण्यात येत आहेत. अलीकडेच, समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोवरून बराच वाद झाला. रणवीर अल्लाहबादियाने शोमध्ये पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केली होती, त्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

आता, रणवीरनंतर, आणखी एका स्टैंड-अप कॉमेडियनने शोमध्ये तिच्या आईबद्दल नावाखाली अश्लील कॉमेडी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.’माझी आई एक कूल आई बनण्याचा प्रयत्न करत :ही स्टैंड-अप कॉमेडियन दुसरी कोणी नसून स्वाती सचदेवा आहे. स्वातीचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे, त्यामध्ये ती तिच्या आईबद्दल अश्लील गोष्टी बोलताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये स्वाती म्हणत आहे की, ‘माझी आई एक कूल आई बनण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती ते करू शकत नाही.’

काय आहे ती व्हायरल क्लिप पाहा:

error: Content is protected !!