आमदार प्रमोद जठार आज व उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन

कणकवली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी ते प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

आमदार प्रमोद जठार यांचा दौरा पुढीलप्रमाणे

दिनांक ७ मे रोजी सकाळी १० वा. दोडामार्ग भाजपा कार्यालय, सकाळी ११:३० वा. सावंतवाडी भाजपा कार्यालय, दुपारी १ वा. वेंगुर्ला भाजपा कार्यालय, सायंकाळी ४ वा. कुडाळ भाजपा कार्यालय, सायंकाळी ६ वा. मालवण भाजपा कार्यालय. त्यानंतरचा वेळ राखीव असेल.

दिनांक ८ मे रोजी

सकाळी १०:३० वा. देवगड भाजपा कार्यालय, सकाळी ११:३० वा. पडेल भाजपा कार्यालय, दुपारी १ वा. वैभववाडी भाजपा कार्यालय, सायंकाळी ३:३० वा. कणकवली ग्रामीण भाजपा कार्यालय, सायंकाळी ५ वा. कणकवली शहर भाजपा कार्यालय आणि सायंकाळी ६:३० वा. तळेरे गावाच्या वतीने त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

आमदार म्हणून निवड झाल्यानंतर जठार यांचा हा पहिलाच जिल्हा दौरा असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून ते सर्व तालुक्यांतील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

error: Content is protected !!