विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी

अश्लील हावभाव करत केला पाठलाग

विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

देवगड : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला शिवीगाळ व धमकी देऊन, अश्लील हावभाव करत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी संशयित सचिन सूर्यकांत राघव (वय ३२) याच्याविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २३ एप्रिल ला सकाळी ६:३० वाजता आपल्या मुलाला शाळेत घेऊन जात होती. यावेळी संशयित आरोपी आपल्या घराच्या कुंपणालगत उभा होता. त्याने पीडित महिलेला वाईट हेतूने हातवारे करून मोठमोठ्याने शिवीगाळ केली आणि धमकी दिली. त्यानंतर ही महिला मुलाला शाळेत सोडून कलम बागेत जात असतानाही संशयिताने अश्लील हावभाव करत तिचा पाठलाग केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने विजयदुर्ग पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन राघव याच्यावर गुन्हा नोंदवला असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत जाधव करत आहेत.

error: Content is protected !!