सावंतवाडीतील ‘त्या’ बँनरमुळे स्थानिक नाराज
सावंतवाडी : उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा छटपूजा उत्सव शहरातील सावंतवाडी येथे उत्साहात साजरा झाला. मात्र सावंतवाडीत मोती तलावाच्या काठाला या निम्मित लावलेल्या एका बॅनरमुळे येथील स्थानिक नाराज झाले असून विविध माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
या बँनरमुळे ‘एक्स’ या सोशल माध्यमावर सुद्धा यूझर्सनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली असा प्रश्न थेट येथील स्थानिक आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आला आहे.
सावंतवाडी परप्रांतीयांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील जमिनीही त्यांच्याकडून खरेदी केल्या जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार येथील जमीन विकणारा स्थानिकच असल्याचा आरोप होत आहे.तर काहींच्या मते थेट युपी – बिहार ला कनेक्टिव्हिटी असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे सावंतवाडीत उत्तर भारतीयांची संख्या वाढत आहे. तर काहींनी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना दोषींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.