तळवणे खाडीत सापडला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

सावंतवाडी : तळवणे-खिरोईवाडी येथील तेरेखोल खाडीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. संबंधिताची ओळख पटण्यास अद्याप यश आलेले नाही. संबंधित मृतदेह हा ४३ वर्ष पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद महादेव केरकर (रा. तळवणे) यांनी पोलिसांना दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोंदा पोलीस दुरक्षेत्राचे बीट अंमलदार अरवारी पुढील तपास करत आहेत. मृताच्या उजव्या हातात रुद्राक्षाची माळ असून त्याने फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि बनियन परिधान केली होती. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!