रिक्षा चालकाला गंभीर दुखापत
सावंतवाडी : मातोंड – तळवडे मार्गांवर रिक्षा समोर गवारेडा अचानक आडवा आल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. यात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अधीक माहिती अशी की रिक्षा चालक मातोंड वरून तळवडेच्या दिशेने जात होते. अचानक गवारेडा रिक्षे समोर आल्याने रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात 4.30 च्या सुमारास घडला. या अपघातात रीक्षेचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Subscribe










