रात्री पावणे बाराची घटना; दुचाकीस्वार गंभीर, तर रिक्षाचे मोठी नुकसान..

सावंतवाडी : सावंतवाडी येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले आहे. तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते अधिकचा तपास याबाबत सुरू आहे.

error: Content is protected !!