कुमार अर्णव राजाराम भिसे या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पहिल्या यादीत स्थान मिळवून आपल्या कुटुंबाचा, शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे. अर्णव भिसेने लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि नियमितपणे अभ्यास करून हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशात मुख्याध्यापक श्री.सुनील ठाकूर सर , शिक्षक श्री.राजाराम भिसे सर , श्री.राजन मर्गज सर , श्रीमती सुस्मिता सावंत मॅडम ,श्रीमती मानसी मेस्त्री मॅडम आणि त्याच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या देदीप्यमान यशाबद्दल हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळा व्यवस्थापन समिती, शाळा सुधार समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.