कणकवली : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर यांना तपासणीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
रोग प्रतिबंधात्मक काळजी, महिलांच्या आरोग्य समस्या आणि एकूण आरोग्यविषयक समुपदेशन हा शिबिराचा मुख्य उद्देश होता.यावेळी विद्यार्थिनींना आरोग्य सेवांची आवश्यकता,आरोग्य आणि कल्याण व्यवस्थापन करण्याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात प्रा. मेघा बाणे, सौ. आदिती सावंत, सर्व महिला अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग होता.या शिबिराने विद्यार्थिनींना एक सक्रिय जीवनशैली राखण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि ते आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. चंद्रशेखर बाबर आणि प्रा. अमर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. निखत मैंदर्गी आणि प्रा. नेहा गुरव यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडली.
युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्ष सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष अभिनंदन आणि कौतुक केले.













