कुडाळ : बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी पिंगुळीतील चार जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संकेत वसंत धुरी (वय 38), शंकर नंदकुमार तेजम( वय 40), बाळकृष्ण रामचंद्र खानोलकर (वय 42) विष्णू बुधाजी धुरी (वय 50) सर्व राहणार पिंगुळी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे कुडाळ पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
या चारही जणांनी खोटे व खोडसाळ पत्र लिहून जावक क्रमांक नमूद न करता व पदाचा उल्लेख करून सह्या करून बनावट कागदपत्र बनवून शासकीय अधिकाऱ्याचा विश्वास संपादन करून स्वतःचा फायदा करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राचा वापर केला म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 316, 318 ,336,61 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत हा प्रकार 26 सप्टेंबर 2024 मध्ये घडला असून याप्रकरणी सतीश वासुदेव धुरी वय 52 पिंगुळी देऊळवाडी यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून 24 मार्च 2025 रोजी कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करीत आहेत.