मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे कारच्या धडकेत म्हशीचा जागीच मृत्यू

रुग्ण घेऊन पडवे हॉस्पिटलकडे जात असताना अपघात

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी सीमावाडी नजीक अल्टो कारची म्हशीला जोरदार धडक बसल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, अल्टो कार ही माणगावहून रुग्ण घेऊन पडवे हॉस्पिटलकडे जात असताना कारची पावशी सीमावाडी नजीक महामार्गाच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या म्हशीला धडक बसली. यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला. नंतर कार दुभाजकाला आदळली. यात कारचे मोठे नुकसान झाले असून यातील एक प्रवाशी किरकोळ जखमी झाला आहे. तर सदर मृत म्हशीच्या मालकाची माहिती प्राप्त झालेला नाही. घटनास्थळी कुडाळ पोलीस स्टेशनवर बिट हवालदार दयानंद चव्हाण यांनी पंचनामा केला.

error: Content is protected !!