
दोडामार्ग-सावंतवाडीतील २५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात
सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (जिमाका) : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसए) मसुदा अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील एकूण २५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्समार्फत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी संशयास्पद वृक्षतोडीची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासंदर्भातील अधिसूचनेच्या अनुषंगाने ही टास्क फोर्स कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. कॅम्पा) आहेत. समितीत उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार सावंतवाडी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग व पोलीस निरीक्षक सावंतवाडी व दोडामार्ग या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड झाल्यास भारतीय वन अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वृक्षतोडीबाबत ऑनलाइन तक्रार करण्यासाठी sdtfsawantwadi@gmail.com या ई-मेलवर माहिती पाठविता येईल. तसेच वनविभाग सावंतवाडी कार्यालयाकडेही ०२३६३-२७२००५ या क्रमांकावर थेट तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे टास्क फोर्सने कळविले आहे.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील गावांची यादी :
सावंतवाडी तालुका :
असनीये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे नेवली सह, दाभिळ, ओटावणे, कानोस, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे.
दोडामार्ग तालुका :
कुंभ्रल, पंतूर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









