नितेश राणे यांनी कणकवलीत मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर निलंबित पोलीस निरीक्षक आमदार निलेश राणेंना आपल्या मतदारसंघात चालतील कसे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य व्यवसाय पूर्णपणे बंद झाले का निलेश राणे यांनी याबाबत जाहीर खुलासा करण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी.
आमदार निलेश राणे यांनी महिना दीड महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व काही पोलीस अधिकाऱ्यांवर अवैध्य धंद्याना पाठीशी घालत असल्याचे तसेच भ्रष्टाचाराचे देखील गंभीर आरोप केले होते.भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास दर पंधरा दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मोठ्या हिरहिरीने मांडले परंतु स्वतःच मोठा गाजावाजा करत पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अवैध्य धंदे ज्यामुळे अख्खी पिढी बरबाद होतेय तो प्रश्न मात्र जाणून-बुजून किंवा अनावधानाने आमदार निलेश राणे यांच्याकडून मांडायचा राहूनच गेलाय की काय.आमदार निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांवर केलेले आरोप स्वतःच्या स्वार्थासाठी नसतील आणि जर का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध्य धंदे पुर्णपणे बंद झाले असतील किंवा पन्नास टक्के जरी अवैध्य धंद्यांना आळा बसला असेल तर आमदार निलेश राणे यांनी सदर बाब पत्रकार परिषदेतून जाहीर करण्याची मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.


Subscribe










