नेरूर मतदारसंघात BSNL सेवा कोलमडली

जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांचा सभागृहात संताप

BSNLअधिकाऱ्यांवर गंभीर आरोप……

नेरूर मतदारसंघातील BSNL ची नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद आहे. याबाबत आज जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी BSNL अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.ते म्हणाले, “नेरूर मतदार संघाच्या परिसरातील सरंबळ,कवटी, चेंदवण, वालावल हुमरमळा या गावांमध्ये लोकांना संपर्क करता येत नाही.मुंबईस्थित लोकांनी आपल्या गावातील नातेवाईक वृद्ध आई तिला ज्यावेळी तिचा मुलगा फोन लावत होता त्यावेळी तिला फोन लागत नाही म्हणून चलबिचल होतो
माझ्या आई कुठे? कशी आहे? काय करत असेल?अशी मुलांच्या मनात शंका निर्माण होते. या गंभीर समस्येचा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला गेल्यावर अधिकारी ‘आम्हाला माहित नाही’ अशी उत्तरे देतात. जनतेच्या सुरक्षेचा आणि दळणवळणाचा प्रश्न आहे.”संबंधित BSNL अधिकाऱ्यांनी 7 दिवसात लेखी अहवाल देऊन समस्या सोडवावी अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

error: Content is protected !!