वेताळ बांबर्डे येथे जागतिक महिला उत्साहात संपन्न

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांचे आयोजन

कुडाळ : शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जाधव मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कुडाळच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता शिरवलकर उपस्थित होत्या.

पुरुष आणि महिला ही एकाच वाहनाची दोन चाके आहेत. आज कित्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कित्येक क्षेत्रात तर महिलांनी पुरुषांपेक्षाही जास्त यांची गाठली आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आजच्या दिवशी करण्यात आला.

अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे सक्षमपणे पेलवणाऱ्या या महिलांसाठी विरंगुळा म्हणून महिलांसाठी खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उपस्थित पहिल्या १०० महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.

आजवर ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या माध्यमातून अनेक अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले. आज देखील महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

error: Content is protected !!