श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत विज्ञानोत्सव साजरा

संतोष हिवाळेकर / पोईप

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व,कोडे मनुष्य मनाला, पडे सदैव सृष्टीचे, जाणू काय कोठे कसे, सप्रमाण विज्ञानाचे या कवितेने झाली. त्यानंतर विज्ञानावर आधारित काढलेल्या रांगोळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.


इयत्ता आठवी नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांनी एकूण 32 प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनात सादर केल्या होत्या. जलशुद्धीकरण,हवा प्रदूषण, हवेच्या दाबावर उपकरण, विद्युत निर्मिती यंत्र,हायड्रोलिक ब्रिज, व्हॅक्युम क्लिनर, घर सुरक्षित उपकरण, सोलार कार, मानवी उत्सर्जन संस्था,रक्ताभिसरण संस्था वॉटर हीटर, चंद्रयान मॉडेल, रेन सेन्सर उपकरण यासारखी अनेक उपकरणे प्रदर्शनामध्ये सादर केली होती. यामध्ये प्रथम क्रमांक कु.आदित्य देसाई, द्वितीय क्रमांक कु.आदित्य घाडीगावकर, तृतीय क्रमांक विभागून कु चिन्मय पालव व कु. संदेश कदम,तसेच उत्तेजनार्थ कु तन्मय वायंगणकर व कु.आयेशा देसाई यांना देण्यात आला. क्रमांक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण )मुंबई चे सह खजिनदार श्री अभिमन्यू कवठणकर यांच्यामार्फत पेन ड्राईव्ह व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले .


प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी विज्ञानाचे जीवनातील महत्त्व, ए.आय.तंत्रज्ञान, तसेच थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रामन या विषयी माहिती दिली. या कार्यक्रम प्रसंगी भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबईचे सह खजिनदार श्री अभिमन्यू कवठणकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडीचे गटनिदेशक आर. ए. जाधव, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोसचे निदेशक परब एम. ए. व प्रशालेच्या शिक्षिका कुमारी प्रतिभा केळुसकर व कुमारी शलाका शिंदे या उपस्थित होत्या.

error: Content is protected !!