बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल जयंती साजरी


कुडाळ : आधुनिक स्काऊट आणि गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल मध्ये साजरी कऱण्यात आली.


स्काऊट गाईड चळचळीचेे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी बेडेन पाॅवेल यांचा जन्मदिवस २२ फेब्रुवारी हा जगभरामध्ये चिंतन दिवस म्हणून साजरा होत असून या दिनाचे औचित्य साधत येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारत स्काऊट्स व गाईड्स गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, ज्येष्ठ शिक्षिका मधुरा ईन्सुलकर, पूर्णिमा साटम, स्काऊट मास्तर रोहिदास राणे, कब मास्तर प्रसाद कानडे यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.

ज्येष्ठ स्काऊट मास्तर रोहिदास राणे यांनी बेडेन पाॅवेल यांचा जीवन परीचय व चळवळीचे महत्व विषद केले. स्काऊट चा उद्देश हा आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे व आपल्या मनात देशभक्तीची भावना रुजवणे हा आहे. आपले आयुष्य खूप आनंदी आहे आणि तुम्हा प्रत्येकाचेही आयुष्य आनंदी असावं यासाठी देवाने आपल्याला या आनंदी जगात आनंदी राहण्यासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी ठेवले आहे आनंद हा श्रीमंत होण्याने मिळत नाही तर आपल्या देशाच्या सेवेने आपल्याला जो आत्मानंद मिळतो .तो सर्वोच्च असतो. प्रसंगी आपण इतरांच्या जीवनात सुद्धा आनंद आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच स्काऊटने सांगितलेले आहे.

यावेळी सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांनी स्काऊटचे विद्यार्थी दशेतील महत्त्व सांगितले .विद्यार्थी दशेत वावरताना आपल्याला शिस्तीची तसेच चांगल्या संस्काराची गरज असते व त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्काऊट मध्ये समाविष्ट होऊन स्वतः शिस्त अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण शिस्तीने आणि चांगल्या संस्कारानेच माणूस भावी जीवनामध्ये यशस्वी होतो. स्काऊटचा गणवेश हा दुःखावर, संकटावर मात करणे, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणे आणि आपल्या देशाची सेवा करणे हे सांगतो. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काऊटच्या माध्यमातून केलेले कार्य लक्षात ठेवले पाहिजे व आपले विद्यार्थी जीवन सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी विविध प्रकारचे गॅझेट, बांधणी इ. चे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. सर्वधर्मिय प्रार्थनेच्या विविध गीतांचा सरावही घेण्यात आला.सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन रोहिदास राणे, विश्वजीत डांगमोडेकर, प्रसाद कानडे इ. नी केले होते.

error: Content is protected !!