शिवजयंती निमित्त स्वामीनंदन सोसायटीमध्ये दीपोत्सव साजरा

कुडाळ : अखंड भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळीकडे उत्साहात साजरी करण्यात आली.

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये स्वामीनंदन सोसायटी येथे सगळीकडे दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटीतील सर्व सदस्यांनी सगळीकडे दिवे लावून शिवरायांप्रती असलेलं प्रेम, आदर व निष्ठा पुन्हा एकदा जागृत केली. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर सोसायटीचे सदस्य बखले, चैतन्य कुडाळकर, योगेश कुडाळकर, लंकू कुडाळकर, योगेश पिंगुळकर, कीर्ती चव्हाण, गीतेश डिगसकर, महाले , सपना पाटिल तसेच धानी, स्वरा, परीका, अथर्व, शुभ्रा आधी बाळगोपाळ उपस्थित होते.

error: Content is protected !!