कणकवली: कणकवली शहरानजीक नागवे येथील रानमाळावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
काय आहे सविस्तर वृत्त?
बुधवारी सायंकाळी सव्वासहा वा. च्या सुमारास कणकवली पोलिस ठाण्यात फोनद्वारे नागवे माळरानावर एक मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेल्या स्थितीत असल्याची माहिती एका नागरिकाने दिली.पोलिस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, हवालदार अमित खाडये, किरण मेथे, मंगेश बावधाने आदींनी घटनास्थळळी जाऊन पहाणी केली. गळफास घेतलेल्या व्यक्तीचे शरीर पूर्णतः कुजलेल्या आढळून आले.दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा तो मृतदेह असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.