परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास विशेष अर्थसहाय्य
ब्युरो न्यूज: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री पदाचा भार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.राज्याची ट्रान्सपोर्ट सिस्टीम बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत.त्यातच आता ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
रिक्षा / टॅक्सी चालकांच्या भविष्यासाठी घेतलेले निर्णय
✅ ६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजने अंतर्गत ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये “सन्मान निधी” दिला जाणार आहे.
✅ कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत.
✅ त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.
✅ कर्तव्यवर असताना एखादा चालकास दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार.
✅ उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक ,उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवणार.













