नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना कुडाळच्या वतीने शाखा कार्यालय येथे स्वागत-सत्कार
कुडाळ : सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक , कार्यकर्ते यांच्या वतीने कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गीय धर्मवीर श्री. दिघे साहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच कुडाळ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या शुभप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कुडाळ नगरपंचायत गट नेते विलास कुडाळकर, नगरसेवक ॲड कुडाळकर, ॲड यशवर्धन राणे, तालुका प्रमुख अरविंद करलकर, योगेश तुळसकर, महीला तालुका प्रमुख सौ रचना नेरुरकर, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी सरपंच दादा साईल, माजी उपसरपंच दिलीप निचम, उपतालुकाप्रमुख बाबी शिंदे, महीला उपतालुकाप्रमुख सौ अनघा रांगणेकर, विभागप्रमुख जयदीप तुळसकर, जेष्ठ शिवसैनिक रमेश घोगळे,सौ रेवती राणे, राजवीर पाटील, प्रसन्ना गंगावणे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.