तिरवडे शाळेत रानभाज्या व तृणधान्य पदार्थ स्पर्धा

सुवर्णा तिळवे व ज्योती फाले प्रथम

संतोष हिवाळेकर / पोईप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवडे नं.१,ता.मालवण शाळेत रानभाज्या व तृणधान्य पदार्थ बनविण्याची स्पर्धा संपन्न झाली.
शाळेतील मुलांचे पालक तसेच ग्रामस्थ यांच्यासाठी आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका उन्नती कराळे व सहशिक्षक गणेश खरात यांनी केले होते.यावेळी परीक्षक म्हणून मधुरा माडये व चंद्रसेन पाताडे यांनी काम पाहिले.यावेळी ग्रा.पं.सदस्या विशाखा गावडे, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष देवेंद्र कदम आदी उपस्थित होते.


स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,रानभाजी पाककृती प्रथम क्रमांक-सुवर्णा संतोष तिळवे (एकपान भाजी),द्वितीय क्रमांक-निशा दिनकर गावडे (धानक भाजी),तृतीय क्रमांक-ललिता लवू कदम (भारंगी फूल भाजी),तृणधान्यापासून पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक-ज्योती आनंद फाले (कुळीथ पिठाचे लाडू),व्दितीय क्रमांक-संजना संजय कदम(ज्वारी पुलाव),तृतीय क्रमांक-साक्षी प्रविण मेस्त्री (मिक्स कडधान्य) यांनी बक्षिसे प्राप्त केली.यावेळी स्पर्धकांना मधुरा माडये व चंद्रसेन पाताडे यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन मुख्या.उन्नती कराळे यांनी तर आभार सहशिक्षक गणेश खरात यांनी मानले.

error: Content is protected !!