नवीन हॉलतिकीट कधी मिळणार?
ब्युरो न्यूज: विद्यार्थ्यांच्या जातीचा प्रवर्ग हॉल तिकिटावर नोंदवण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती अखेर बोर्डाने ह्यात सुधारणा करत नवीन हॉलतिकीट तयार केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12 वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.मात्र यामुळे एकच खळबळ उडाली हा जात प्रवर्ग का नोंदवण्यात आला? यामागील कारण काय? असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नवीन हॉलतिकीट देण्यात येणार आहेत.
मोठी बातमी! शिक्षकांना लावावी लागणार बायोमेट्रिक हजेरी
दरम्यान विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर बोर्डाने विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख केला होता. यावरुन शिक्षकतज्ज्ञांसह, पालकांनीही प्रश्न उपस्थित केले होते. एखाद्या विद्यार्थ्यांची जात नमूद करुन बोर्डाला काय सिद्ध करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होता, त्यामुळे आता बोर्डाने हा निर्णय बददला आहे. मंडळाकडून परिपत्रक काढून निर्णय रद्दमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून हा निर्णय रद्द करत असल्याचे म्हटले आहे.
काय आहे पत्रकात?
या पत्रकात बोर्डाने म्हटले की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुकवार दिनांक 10/01/2025 रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.या संदर्भात कळविण्यात येते की, मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर जातीचा प्रवर्ग या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील सदरचा जातीचा प्रवर्ग कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी.
कुठे मिळेल नवीन हॉलतिकीट?
सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे गुरूवार दिनांक 23/01/2025 पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलव्ध करून देण्यात येत आहेत.













