मातोश्रीच्या वाटेवर भाजपाचा नेता..?
राजापूर साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांचा राजीनामा
लांजा प्रतिनिधी: सध्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय वळणं घेताना दिसत आहेत.कोण कोणाच्या पक्षात प्रवेश करत आहे,तर कोण अपक्ष लढत आहे.यातच आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
राजापूर – साखरपा विधानसभा प्रमुखांचा राजीनामा
भाजपाच्या लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, नाराज असलेल्या उल्का विश्वासराव या लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवबंधनात अडकणार असल्याचे खात्रीलायक समजते.
मतदार संघात पक्ष बंधनिवर दिला भर
उल्का विश्वासराव या गेली दहा वर्षे लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघात सक्रियपणे भाजपाच्या काम करत आहेत. आपल्या कार्यकुशलतेने त्यांनी या मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीवर भर दिला होता. लांजा तालुक्याच्या त्यांनी संघटना बांधणीवर भर दिला होता. तालुक्यात भाजपा पक्षाला नवसंजीवनी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पक्षासाठी दिलेला योगदानाची पक्षस्तरावर योग्य ती दखल घेतली जाईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून योग्य तो सन्मान राखला न गेल्याने त्यांनी आपल्या विधानसभा निवडणूक प्रमुख पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
त्यामुळे लांजा भाजपा पक्षात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, नाराज असलेल्या उल्का विश्वासराव या मातोश्रीच्या संपर्कात आल्या असल्याचे बोलले जात आहे. उल्का विश्वासराव यांच्या या निर्णयामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोर का झटका बसला आहे.
[…] ऐन निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपाला मोठ… […]
[…] ऐन निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपाला मोठ… […]
[…] कोणते उद्दिष्ट नाही त्यामुळे ते भारतीय जनता पार्टी व महायुतीची बदनामी करण्यासाठी […]