तीन पैकी एक आरोपी ताब्यात
मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाब सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या प्रकरणात आता पोलिसांना एक मोठा पुरावा सापडला आहे. पोलिसांना संशयीत आरोपी सैफच्या घरातून पायऱ्या उतरत असलेला एक सीसीटीव्ही फुटेज मिळाला आहे.तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोणत्याही क्षणी पोलिस आरोपीला घेऊन येणार आहेत.तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
कसा केला आरोपीचा शोध?
आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे. त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरून सैफच्या इमारतीत शिरकाव केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे. मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला होता,
अशाप्रकारे हा चोरटा सैफचा घरात शिरला आहे.पायऱ्यांवरून घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी प्रभादेवीत असल्याचे समजताच पोलिसांनी चोरट्याला माग काढत त्याला ताब्यात घेतले आहे. अद्याप दोन आरोपी फरार आहे. पोलिस या दोन आरोपींचा शोघ घेत आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













