कुडासे तिठा येथे झालेल्या अपघातात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

साटेली भेडशी येथे झालेल्या अपघातात मोर्ले येथील युवक प्रसाद तुकाराम कांबळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

साटेली भेडशी येथील कुडासे तिठा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी डंपरखाली आल्याने मोर्ले येथील दुचाकीस्वार प्रसाद तुकाराम कांबळे (२७) गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गोवा बांबोळी उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

error: Content is protected !!