तर ते राजकरणात टिकणार कसे?

उबाठाच्या स्वबळावर निवडणूक लढवण्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुक लढवण्याचे संकेत दिल्याच संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाकडून झालेल्या या घोषणेनंतर आता शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही” असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले.

या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय

“2019 ला जनमताचा कौल मिळालेला असताना काँग्रेससोबत जाणं. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणं. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. त्या काँग्रेसचा प्रचार केला. भाषणात हिंदूह्दय सम्राट शब्द न वापरणं, या सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल” असं उदय सामंत म्हणाले.….तर ते राजकरणात टिकणार कसे?ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, “योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहित. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल. म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील”

अपेक्षित यश मिळेल का?

’15 वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही’ असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं. “पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल, तर त्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचं प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकरणात टिकणार कसे?” असं उदय सामंत म्हणाले.

उबाठा मध्ये प्रचंड असुरक्षितता

बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत, ते परत येऊ शकतात असं ठाकरे बोलले आहेत. त्यावर उदय सामंत म्हणाले की, “ते तुम्ही असं कुठे म्हणाले. काल परवाची त्यांची भूमिका आणि आजची भूमिका यातून दिसतय प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो”

error: Content is protected !!