आमिषे सर्वांनाच येत आहेत मात्र त्या आमिषांना बळी पडावे की नाही हे आपण ठरवले पाहिजे. निष्ठावंतांना आज ना उद्या नक्की संधी मिळेल. जे कार्यकर्ते आमच्याबरोबर थांबले आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे.  चुकीच्या कामांना विरोध करण्यासाठी लोकांचे मनोधैर्य आपण वाढवलं पाहिजे.  विकास कामांवर खर्च होणारा शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च होत आहे की नाही, की त्यात भ्रष्टाचार होत आहे यावर लक्ष ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. दीड वर्ष झाली गगनबावडा घाट बंद आहे. त्यावर आपण आवाज उठवला पाहिजे असे मार्गदर्शन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
        शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका कार्यकारणीची बैठक आज वैभववाडी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 
        याप्रसंगी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, आज आपल्याकडे सत्ता नाही म्हणून अनेकांना वाटेल की आपल्याकडून जनहिताची कामे होणार नाहीत. मात्र आपण विरोधक म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले, जनतेच्या प्रश्नावर टोकाचा संघर्ष केला तर सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना आपली कामे करावीच लागतील. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण जागरूक राहून जनतेला जागरूक करावे. प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे सांगितले.
     युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, शिवसेनेने अनेक वादळी सोसली असून वेळोवेळी ती परतवून लावली आहेत. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा संघटना बांधण्याचे काम आपण केले पाहिजे. आणि लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आतापासूनच सर्वांनी कामाला लागा असे सांगितले.
    यावेळी शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, नलिनी पाटील, सानिका रावराणे, मानसी सावंत, स्वप्निल धुरी, रोहित पावसकर, सरपंच सुनील कांबळे, सरपंच जितेंद्र तळेकर, विठोजी पाटील, सूर्यकांत परब, सुनील कांबळे, विलास पावसकर, डॉ.आर. व्ही. जाधव, राजाराम गडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.1
 / 
67


उद्या वैभव नाईक जरी पक्षात येत असतील तरी त्यांचे स्वागत करा #nileshrane #vaibhavnaik #rajanteli

बीजेपीमध्ये जे आहेत ते सगळे माझेच सहकारी आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #deepakkesarkar

निलेश राणे उभे आहेत ना १०० % मी निवडून येणार Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik #sindhudurg

कापा म्हणजे ? मर्डर करा ? एवढं सोपं आहे का ? निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #sindhudurg #kudal

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी  ACB कटिबद्ध #sindhudurg #acb

तुझ्या औकातीत रहा संजू परब यांचा विशाल परबांना थेट इशारा #sawantawadi #vishalparab #sanjuparab

खोटया गुन्हयात अडकवले वकीलांचा पोलिसांवर आरोप #sindhudurg #kudal #breakingnews

रणझुंजार मित्रमंडळ नेरूर व रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नरकासुर स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल #sindhudurg #kudal

तेर्से बांबर्डे मळावाडी येथील ब्रिजचे काम शंभर टक्के पूर्ण करणार- निलेश राणे Nilesh Rane #nileshrane

कोणी कोणाला काढलं तेच समजत नाही ! #rajthackeray

वाडी - वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा
1
 / 
67

 
	

 Subscribe
Subscribe









