कुडाळ बस आगरासाठी तीन नवीन गाड्या उपलब्ध, आमदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा.

आमदार निलेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण होणार.

कुडाळ : आगरासाठी नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आमदार निलेश राणे हे सातत्याने आग्रही होते यासाठी आमदार निलेश राणे यांचा शासनस्थरावर पाठपुरावा सुरू आहे या बाबत दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी परिवहन मंत्री यांना पत्र देऊन आमदार निलेश राणे यांनी नवीन बस देण्याची मागणी केली होती, त्यानंतर मालवण तालुक्यासाठी एकूण १० व कुडाळ तालुक्यासाठी ५ नवीन गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आज पुन्हा नव्याने ३ गाड्या कुडाळ आगरासाठी प्राप्त झाल्या असून सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आमदार निलेश राणे यांच्या बैठकीनंतर आठ दिवसातच या गाड्या कुडाळ येथे दाखल झाल्या आहेत. या तीन गाड्यांमुळे कुडाळ मालवण मतदारसंघातील नवीन बस गाड्यांची संख्या आता १८ झाली आहे.

error: Content is protected !!