अरविंद सावंत यांच्या “त्या” वक्तव्याची शिवसेनेकडून गंभीर दखल

सावंत यांची खासदारकी रद्द करा; महिला आघाडीचे निवेदन

ब्युरो न्यूज: अरविंद सावंत यांनी शिवसेनेचे शायना एन. सी यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याची गंभीर दखल घेत आता शिवसेनेने नागपाडा पोलीस स्थानकात आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आसून, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७९ आणि कलम ३५६/२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

उबाठा गटाची महिलांविरोधी मानसिकता यातून दिसून आली.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर यावर बोलताना शायना एन. सी म्हणाल्या,आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. “मला राजकारणात २० वर्षे झाली आहेत. मी महिला आहे. “माल” नाही. कोणत्याही महिलेविरोधात अपशब्द वापराल तर महिला शांत बसणार नाहीत.” असा इशारा शायना एन.सी यांनी दिला. “मुंबादेवीच्या आशीर्वादाने मी मुंबईकरांची सेवा करत आहे. अरविंद सावंत आणि उबाठा गटाची महिलाविरोधी मानसिकता यातून दिसून आली.” अशी टीका शायना एन.सी यांनी केली.महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती”एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजना राबवत आहेत. महिलांचा मान-सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे; मात्र अरविंद सावंत यांनी अश्लाघ्य शब्दांत महिलांचा अपमान केला. ही त्यांची संस्कृती आहे का?” असा सवाल शायना एन.सी यांनी केला. त्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत, शरद पवार नाना पटोले या नेत्यांना सावंत यांच्या वक्तव्यावर गप्प का, असेही विचारले.

नारीशक्ती या निवडणुकीला उबाठाला धडा शिकवणार

यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी देखील अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले असून त्या म्हणाल्या ,सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत उबाठाला धडा शिकवेल, यावेळी सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारे निवेदन महिला आघाडीकडून पोलिसांना देण्यात आले.

ठाकरेंना शिवसेनेचा पाठिंबा?;मुख्यमंत्री आग्रही मात्र…

दरम्यान “सावंत यांच्या वक्तव्यावर उबाठा आणि आदित्य ठाकरे काय कारवाई करणार?” असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला.महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ झाला. मात्र महाविनाश आघाडीच्या नेत्यांना महिला म्हणजे ‘माल’ वाटत आहे. “सावंत यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करताना काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल बाजूला उभे राहून हसत होते. यापेक्षा दुर्देवी आणि शरमेची बाब काय असू शकते?” अशी टीका शायना एन.सी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *