पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय महाराष्ट्राचा धसका: शरद पवार

शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.अशातच मागच्या निवडणुकी मधे भाजपाला महाराष्ट्रात आपल्या सर्वाधिक जागा निवडून आणता आणल्या नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. दरम्यान या सर्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर घेतली होती. त्यामुळे भाजपा ने विधानसभा निवडणुकीत जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील महाराष्ट्रात प्रचार सभा होणार आहेत अशी चर्चा होत आहे.यावरूनच आता शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आ.नितेश राणे यांनी घेतली बेळणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीकडून प्रचाराचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने मेगा प्लान आखला असून राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांसारखे अनेक मोठे चेहरे जाहीर सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या 10 सभा होणार आहेत. त्याविषयीही शरद पवार बोलले. ‘ पंतप्रधानांच्या राज्यात इतक्या सभा होणार आहेत, त्याअर्थी त्यांनी महाराष्ट्राचा धसका घेतला आहे. पंतप्रधान 8 ठिकाणी येतात की 16 ठिकाणी. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या 16 की 12 सभा आहेत’,असं पवार म्हणाले

error: Content is protected !!