एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी वापरावी हे दृदैव
अरविंद सावंत यांनी दाखवली उबाठा ची वैचारिक पातळी
ब्युरो न्यूज:शिवसेना मुंबादेवी विधानसभा मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या उबाठा चे खासदार अरविंद सावंत यांच्यावर काल नागपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून आता या सर्व प्रकरनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आवाज उठवला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
उबाठाच्या एका खासदारांनी शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी यांच्या संदर्भात केलेले विधान हे समस्त स्त्री जातीचा अपमान करणारे आणि उबाठाची वैचारिक पातळी दाखवणारे आहे. एका स्त्रीचा उल्लेख ‘माल’ असा करुन अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या पराक्रमी परंपरेला आणि पुरोगामी विचारसरणीला शरमेने मान खाली घालायला लावली आहे.
अरविंद सावंत यांच्या “त्या” वक्तव्याची शिवसेनेकडून गंभीर दखल
राजधर्म शिकवणाऱ्या माता जिजाईपासून तर समाज सुधारणेचा वसा घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंतची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. स्त्रीत्वाचा सन्मान आणि महिलांना सक्षम करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा मराठी माणसाचा डीएनए आहे. आमच्यासाठी प्रत्येक महिला ही लाडकी बहिण असून तिची उन्नती, तिचा विकास, तिची प्रतिष्ठा आणि तिचा स्वाभिमान हाच आमचा ध्यास आहे. राजकारणापायी एखाद्या व्यक्तीने एवढी खालची पातळी गाठावी हे दुर्दैवी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार शायना एन सी. यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान काँग्रेस उमदेवार अमीन पटेल यांच्या प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.”अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण चांगलच तापलं आहे.शायना एन. सी यांनी संताप व्यक्त केला. तसंच, राज्यभरातील विविध राजकीय नेत्यांनी अरविंद सावंत यांच्यावर टीका केली.