प्रतिबिंब कोकणचं – सिंधु दर्पण

कोकण… कोकण म्हणजे निसर्गाच्या कुंचल्यातून रेखाटला गेलेला एक अद्भुत कलाविष्कार. कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, सूर्यप्रकाशात चमकणारी रुपेरी वाळू अन् चंदेरी लाटा, आकाशाच्या उदरात शिरू पाहणारे उंचच उंच डोंगर आणि मधाळ मनाची कोकणी माणसं या सगळ्याची व्यवस्थित सांगड घालून कोकण विकासाचे नवे प्रतिबिंब दाखवण्यासाठी सिंधुदर्पण हे अस्सल कोकणी मातीचा सुगंध असणारे नवे डिजिटल न्युज चॅनेल शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांच्या सेवेत रुजू होत आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटनाचा कोहिनूर म्हणून ओळख असलेला कोकण आता जुनी कात टाकून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोकण विकासाला साथ देत कोकणच्या आरोग्य, शिक्षण, पर्यटन, उद्योग, संस्कृती आदी पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यासाठी पत्रकारितेच्या क्षितिजावर सिंधुदर्पण या नव्या डिजिटल न्युज चॅनेलचा उदय होत आहे.

कोकणासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती दर्शकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे चॅनेल सदैव तत्पर असणार आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी एक जबाबदार प्रसारमाध्यम म्हणून सिंधुदर्पणची लेखणी परखडपणे चालणार आहे. थोडक्यात सांगावं तर विकसित कोकणाच्या उज्वल भविष्याचं प्रतिबिंब आपल्याला सिंधु ‘दर्पण’ मध्ये पाहता येणार आहे. परंतु यासाठी कोकणवासियांचे प्रेम आणि विश्वास यांची आवश्यकता आम्हाला नेहमीच भासणार आहे. आपले सर्वांचे प्रेम आमच्यासाठी एखाद्या ‘एनर्जी ड्रिंक’ प्रमाणे काम करणार आहे. आपला प्रेम आणि विश्वासरुपी आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव रहावा हीच अपेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *